ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी संयोगिता राजेनिंबाळकर मलकापुरात

येरमाळा – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी संयोगिता राजेनिंबाळकर यांनी मलकापुर ता कळंब येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली . दिनांक ११ रोजी संयोगिता राजेनिंबाळकर यांनी येरमाळा गटातील विविध गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला . सकाळी आठ वाजता मलकापूर येथे येऊन त्यांनी गावातील महिलांशी विविध समस्या व विषयांवर चर्चा करून ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना मतदान करण्याचे आवाहन केले . संयोगिता राजेनिंबाळकर यांचे स्वागत मलकापूर येथील महिला शिवसैनिक चंद्रकला लोमटे यांनी केले . यावेळी सरपंच रुक्मीणी घोळवे, सुंदर लोमटे, शाहु लोमटे, आगतराव घोळवे, किरण लोमटे, तुकाराम लोमटे,पाशाभाई सय्यद, सुधीर पायाळे, यांच्या सह महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते . संयोगिता राजेनिंबाळकर यांच्या या बैठकांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .