शिंदे हॉस्पिटल येथे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न

येरमाळा प्रतिनिधी –
येरमाळा येथील शिंदे हॉस्पिटल स्त्री व बळरुग्णल्य तर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उतम असा प्रतिसाद मिळाला.
शिबिराचा प्रारंभ डॉ. सुशीकुमार सरडे,डॉ.अविनाश तांबारे , डॉ.सौ.योगिता स्वप्नील शिंदे चोधरी आणि डॉ.स्वप्नील गणेश शिंदे यांनी धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला.शिबिरास येरमाळा, रत्नपुर,बागरवाडी ,पानगाव येथील ७० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला होता. शिंदे हॉस्पिटलच्या स्त्रीरोग विभागाचा उद्घाटन निमित्त तसेच जागतिक आरोग्य दिनानिमित्त शिंदे हॉस्पिटल येरमाळा, आई हॉस्पिटल धाराशिव, कृष्णा हॉस्पिटल कळंब, श्री क्लिनिक लॅब कळंब यांचे मार्फत सर्व महिला व गर्भवती स्त्रियांची मोफत आरोग्य तपासणी तसेच मोफत वंधत्व निवारण शिबिर आयोजित करण्यात आले होते, परिसरातील अनेक गर्भवती स्त्रिया आणि निसंतान जोडप्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
येरमाळा मध्ये स्त्री रोग तज्ञ डॉक्टर योगिता स्वप्नील शिंदे चौधरी यांच्याकडून महिलांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.