ताज्या घडामोडी

भारतातील सर्वात मोठी लष्कर छावणी आणि तोफखाना उभा करणारा चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर..!

भारतातील सर्वात मोठी लष्कर छावणी आणि तोफखाना उभा करणारा चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर असुन इतिहासकारांनी एकदा मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात असलेल्या भानपुरा-रामपुरा-हिंगलाजगड-गांधीसागर भागात जावून इतिहासाची अवशेष शोधावीत देशातील सर्वात मोठी लष्करी छावणी महाराजा यशवंतराव होळकर यांनी केली होती. तर नावली गावात मोठा तोफखाना तयार करुन त्यांनी तोफा तयार केल्या होत्या इंग्रजांचा समुळ नायनाट करण्यासाठी यशवंतराव महाराजांनी मोठी मोहीम हाती घेत तोफखाना सुरू करुन स्वतः तोफखान्यात तोपचीच्या खांद्याला खांदा काम करीत होते.कोणत्याही परिस्थितीत इंग्रजांनी देश सोडून गेले पाहिजे यासाठी यशवंतराव महाराज त्यांची हानी करीत होते. शाहीर अमरशेख यांनी रचलेल्या पोवाड्यात यशवंतराव महाराज इंग्रजांना लढण्याचे आव्हान देत म्हणतात कि..

करीन रक्तबंबाळ देश मी ब्रिटीशानो तुमचा!
भारभुमीच्या तसुतसुवर हक्क फक्त अमुचा !!
फंदफितुरी बंद करा अन या मैदानाला !
मेल्या आईचे दुध होळकर नाही हो प्याला!!
नेपोलियन युरोपात ह्यो होळकर हिकंड !
अडकित्यातील जशी सुपारी करु तुकडं तुकडं !!

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या भरतपूर युध्दातील प्रसंगानंतर ब्रिटनचे पंतप्रधान पीट यांनी भारताचा जनरल गव्हर्नर ड्युक आँफ वेलिग्टंन वेलेस्ली यांस खरमरीत पत्र लिहुन जनरल गव्हर्नर पदावरून पदच्युत करीत तडकाफडकी त्यास ब्रिटनला माघारी बोलावले होते.इतिहासातील ही क्रांतिकारी घटना असुन महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शौर्य आणि पराक्रमाची साक्ष देणारी आहे.
महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.

महाराजा यशवंतराव होळकर जयंतीनिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा…!

रामभाऊ लांडे
अभ्यासक होळकर राजघराणे, इंदौर
मो.9421349586

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.