ताज्या घडामोडी

श्री नृसिंह गणेश मंडळामार्फत आयोजित सर्व रोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

तेरणा काठ न्युज 
सलग तेरा वर्षांपासून सामाजिक,शैक्षणिक ,सांस्कृतिक
,कार्यक्रमात अग्रेसर असणारे नृसिंह गणेश मंडळांच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीरास गावातील व परिसरातील 500 हून अधिक महिला पुरुषांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन लाभ घेतला व स्वताच्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
डॉक्टर व केमिस्ट असोसिएशनच्या आवाहनाला नृसिंह गणेश मंडळांने साद देत घेतलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती विकास बारकुल होते तर
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षिरसागर, येरमाळ्याचे भूमिपुत्र तहसीलदार शिवानंद बिडवे, उपप्राचार्य सुनील पाटील, येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.संदीप तांबारे, येरमाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन बारकुल, डॉक्टर व केमिस्ट
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ .राजकुमार घुगे , सोमनाथ बारकुल यांचे प्रमुख उपस्थिती होती, यावेळी उपस्थित मान्यवरांनी मानवी आरोग्यावर उपस्थितांना अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले डॉ घुगे ,डॉ तांबारे, डॉ सौ भगत, डॉ कोरे, डॉ पवार, डॉ बांगर डॉ सौ बांगर, डॉ सौ तांबारे यांनी तपासणी केली 500 हून अधिक रुग्णांची तपासणी या शिबिरात करण्यात आली गोविंद मुंढे
कश्मीर शेख जाफर शेख,रघुनाथ बारकुल ,किरण पौळ ,
सुरज वणवे ,सौरभ बैरागी ,चैतन्य चाळक , नयन मुंढे
अजेन्द्र शामकुळे ,अण्णासाहेब माढेकर ,वैभव बारसकर या मेडिकल स्टोअर्सवाल्यांनी औषधांची व्यवस्था केली होती.यावेळी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथील ब्लड बँक ची पथक आले होते 20 हून अधिक तरूणांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाफरभाई शेख यांनी केले या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी नृसिंह गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव अनुक्रमे आकाश बारकुल प्रसाद बारकुल आतिश बारकुल कुलदीप बारकुल महेश बारकुल समाधान बारकुल देवानंद बारकुल लखन मोरे अविनाश मोरे अल्ताफ पठाण विशाल बारकुल तेजस बारकुल लहू बारकुल यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बारकुल , रामेश्वर चौधरी यांनी केले शेवटी आभार गोरख बारकुल यांनी मानले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.