ताज्या घडामोडी

येरमाळा येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेची स्थापना

येरमाळा प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील येरमाळा येथे प्रहार अपंग क्रांती संस्था प्रणित प्रहार अपंग क्रांती आंदोलन (महाराष्ट्र राज्य) या संघटनेचा शाखा स्थापना कार्यक्रम थाटात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे होते, यावेळी जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष गणेश शिंदे. माजी सभापती विकास बारकुल ,उपसरपंच गणेश बारकुल शिवसेना विभागप्रमुख राहुल पाटील, विलास थोरबोले, सरपंच सुनील वाघमारे , दत्ता बारकुल लहू बारकुल,बाबा शेख, नवनाथ कासार, अनिल मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या संघटनेचा येरमाळ्यात शाखेची स्थापना करण्यात आली, यावेळी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये अध्यक्ष मारुती वाघमारे ,उपाध्यक्ष किरण बारकुल तर सचिवपदी वसंत जाधवर, सहसचिव राजेश बारस्कर, कोषाध्यक्ष नागनाथ मेजर बारकुल, सह कोषाध्यक्ष नितीन कवडे यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
जिल्हा संघटक धाराशिव बाळासाहेब कसबे यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले तसेच शासनाच्या दिव्यांगासाठी च्या विविध योजना ची माहिती दिली व अपंगांनी आत्मनिर्भर कसे व्हावे याबद्दलची माहिती दिली . अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष प्रहार मयूर काकडे यांनी अपंगाचे अधिकार व सर्व अपंगांना येरमाळा गावकऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल तसेच शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व अपंग बांधवांनी त्यांच्या अधिकाराचा वापर योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने करावा असे संबोधित केले.
तसेच प्रहार अपंग क्रांती संस्थेतर्फे येरमाळा येथील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारुती वाघमारे, किरण बारकुल, वसंत जाधवर, राजेश बारस्कर, नागनाथ बारकुल, नितीन कवडे, भास्कर कळसाईत, बाळासाहेब बारकुल, सचिन बारकुल, शेरखा पठाण, रवि बारस्कर, दिगंबर गाढवे, सुजित कावळे, आम्रपाली जाधव, रोहित बारस्कर, दत्ता मनगीरे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती वाघमारे यांनी तर सूत्रसंचालन बालाजी बारकुल यांनी केले शेवटी उपस्थितांचे आभार किरण बारकुल यांनी मानले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.