होमहवनात कोहळ्याचीच पुर्णाहुती मात्र गावकऱ्यांच्या बकरा बळी भोगी प्रथेला परवानगी

तेरणा काठ न्युज
येरमाळा श्री येडेश्वरी देवी नवरात्र महोत्सवात होणाऱ्या होमहवनात कोहळ्याचीच पुर्णाहुती देण्यात येणार असली तरी गावकऱ्यांच्या भोगी (बकराबळी ) कार्यक्रम चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
होमहवनात अजाबळी प्रथा सुरु करावी अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन देवस्थान ट्रस्ट,देवीचे मानकरी,ग्रामस्थ, पत्रकारांची येरमाळा पोलीस ठाण्यात बैठक घेऊन देवस्थाच्या वतीने भोगी कार्यक्रम चालु तर होमहवनातील कोहळा पूर्णाहुती प्रथा कायम ठेवण्याचे घोषीत करण्यात आले. यावेळी श्री येडेश्वरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त समाधान बेदरे यांनी घोषीत केले.ट्रस्टच्या या निर्णयाने जमलेल्या ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात आले. १ जानेवारी २०२५ पासुन भोगीच्या पावत्या देण्यात येतील ,देवीच्या मुख्यमंदिरात बकराबळीच्या कार्यक्रमाने मंदिराचे पवित्र्य टिकावे,दुर्गंधी पसरुन भाविकांना त्रास सहन करावा लागु नये.म्हणुन मंदिराच्याखाली ट्रस्टच्या जागेत भोगी कार्यक्रमासाठी पत्राशेड उभारणार असुन पुरणपोळीचा स्वयंपाक मंदिरात,तर बकराबळी भोगीच्या स्वयंपाक, जेवणावळीसाठी पत्राशेड लवकरात लवकर उभे करण्यात येईल सहायक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर,यांनी आयोजीत केलेल्या बैठकीस पोलीस उपनिरीक्षक देविदास आवारे,विलास जाधव,देवस्थान ट्रस्टच्या वतीने समाधान बेदरे,गणेश बेदरे,मानकरी अमोल पाटील,राहुल पाटील,यशवंत पाटील, पत्रकार बांधव यांच्यासह बैठकीस ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.