प्रा. संतोष तौर यांना श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थानच्या वतीने देण्यात येणारा समाजकार्य कार्यसेवा पुरस्कार जाहीर

तेरणा काठ न्युज
जनहीत समाज कार्यात कोणीतरी माझ्या बरोबर येईल अशी वाट न पाहता निघालेल्या संतोष तौर यांनी तरूणांना आर्थिक पाठबळ व धैर्य विचार करण्याचे बळ देत मोठ्या संख्येने मित्रपरिवार जोडला. आणि त्यातून एक जनहित परीवार तयार झाला याचं जनहित परीवाराच्या माध्यमातून जनहित पतसंस्था, जनहित सामाजिक संस्था, महिलांसाठी पतसंस्था अशा संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवत जनतेत एक चांगले स्थान निर्माण करण्यात त्यांना चांगले यश मिळत असून नुकतेच सहकार क्षेत्रातील अतिउच्च पुरस्कार दीपस्तंभ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे कळंब तालुक्यातील श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान एक प्रसिद्ध संस्थान असून या संस्थस्थानाने संतोष तौर सर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना एक आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे लवकरच हा पुरस्कार व्यतिरिक्त केला जाणार असल्याचे कळते संतोष तौर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल जनहित परिवार व नागरिकांतून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे