ताज्या घडामोडी

पत्रकार विशाल जगदाळे यांना जीवे मारण्याची धमकी.:: गुंडावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी 

धाराशिव:-येथील विश्व विशाल न्यूज चे मुख्य संपादक विशाल अशोक जगदाळे यांना जिल्हा परिषद समोर धमकी देण्यात आली.असून आरोपी विरुद्ध आनंद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.आरोपी नवनाथ मडके हा संभाजी विद्यालय मंगरुळ येथे क्लार्क असून त्याने संभाजी विद्यालय मंगरुळ या संस्थेचे चे अध्यक्ष अच्युत पाटील व संस्थेचे सचिव रामेश्वर वाघमारे यांच्या संगण्यावरून पत्रकार विशाल जगदाळे यांना दि.08/07/2024.रोजी तू संभाजी विद्यालय मंगरुळ या शाळेविषयी माहिती चा अधिकार का टाकला व माहिती का मागवत आहे.तू जर माहिती मागवण्याचा प्रयत्न केला तर तुला अच्युत पाटील व रामेश्वर वाघमारे जीवे मारतील असा दम दिला.हा सगळा प्रकार जिल्हा परिषद धाराशिव च्या समोर झाला असून पुढे पोलीस काय कारवाई करतात हे पाहावे लागेल.पत्रकाराला दिवसा ढवळ्या धमकी दिल्याने पत्रकार संघटना आक्रमक झाली असून आरोपी वर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.