ताज्या घडामोडी

धाराशिव मध्ये 12 नोव्हेंबर रोजी उध्दव ठाकरे यांची होणार सभा

तेरणा काठ वृत्तसेवा 

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास घाडगे-पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सभा धाराशिव येथे मंगळवारी सायंकाळी होणार आहे. ,

महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास घाडगे-पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मंगळवारी धाराशिवमध्ये येणार आहेत. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. या उलथा पालथीमध्ये शिवसेनेचे तब्बल चाळीस आमदारांनी बंड करून भाजपासोबत सरकार स्थापन केले होते. या बंडामध्येही कैलास पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारासोबत राहीले होते. म्हणून त्यांची उमेदवारी पहिल्या यादीत घोषित करण्यात आली. या सभेतून उद्धव ठाकरे मतदारांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना काय संबोधित करणार आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.