कॅप्टन वंदना पांडुरंग गायकवाड यांचा सत्कार.

अहोरात्र देश सेवा करणाऱ्या कॅप्टन वंदना पांडुरंग गायकवाड यांचा सत्कार.करण्यात आला
कॅप्टन वंदना पांडुरंग गायकवाड यांचे गाव देवळाली आहे. त्यांचे वडील शेतामध्ये मजुरी करत असे.कॅप्टन वंदना पांडुरंग गायकवाड यांचे प्राथमिक शिक्षण देवळाली येथे तर माध्यमिक शिक्षण जयप्रकाश विद्यालय रुईभर या ठिकाणी पूर्ण झाले.त्यांची अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पुढे विविध स्पर्धा परीक्षा दिल्या. आणि त्या सन 2008 मध्ये भारतीय लष्करामध्ये नोकरीसाठी रुजू झाल्या.
त्या सध्या आसाम राज्यामध्ये नोकरीसाठी आहेत. त्या सुट्टीसाठी त्यांच्या मूळ गावी देवळाली या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या बॅचच्या वर्ग मित्रांनी त्यांचा सत्कार देवळाली या ठिकाणी केला. यावेळेस त्यांचे वर्गमित्र संतोष जाधव, अशोक पवार, संतोष वडवले व मित्रपरिवार आणि देवळालीचे ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी तेथील आनंदीमय वातावरणामध्ये कॅप्टन वंदना पांडुरंग गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले.