संविधान दिन साजरा करण्याचे शासकीय अधिकारी विसरले ;; दोन दिवसात अहवाल दाखल करण्याचे तहसीलदार यांचे आदेश

————-कळंब/जयनारायण दरक—-
संविधान दिना दिवशी कळंब येथील अनेक शासकीय कार्यालय कुलूप बंद असल्याचे निदर्शनास आले होते. याविषयी कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुलजी मुळे यांनी तक्रार दाखल करुण संबंधित कार्यालय प्रमुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या गंभीर विषयाची कळंब तहसीलदार यांनी तात्काळ दखल घेऊन कळंब शहरातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुख यांना संविधान दिन साजरा केला किंवा कसे याचा फोटो सह स्वयंस्पष्ट अहवाल तात्काळ दोन दिवसाच्या आत सादर करण्याचे आदेश दिले आहेत ज्यामध्ये मुख्याधिकारी नगर परिषद, गटविकास अधिकारी पंचायत समिती, तालुकाकृषी विभाग, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उप विभाग, गट शिक्षणाधिकारी, पशुधन विकास अधिकारी, उप विभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग, महिला व बाल विकास अधिकारी, एकात्किक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प, दुय्यम निबंधक, सहाययक निबंधक सहकारी संस्था, उप अभियंता दुरसंचार निगम लि, उप अभियंता म.रा.वि.वि.कंपनी, तालुका आरोग्य अधिकारी, उपअधिक्षक भुमी अभिलेख, आगार प्रमुख म.रा.प.मं, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेत विदयालय, अधिक्षक शासकीय वस्तीगृह, वैदयकीय अधिकारी शासकीय रुग्णालय, सामाजिक वनीकरण, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब या सर्व कार्यालयांचा यामध्ये समावेश आहे. संविधान दिन यादिवशी बंद असलेले शासकीय कार्यालय काय अहवाल पाठवतात याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागुन राहिले आहे