ताज्या घडामोडी

एम एस बी अर्बन सोसायटीचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा

तेरणा काठ वृत्तसेवा

येरमाळा येथील एम एस बी अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाचे प्रतिमापूजन यशदा मल्टीस्टेटचे चेअरमन सुधीर सस्ते, येडेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब बेंद्रे, दत्त संस्थांचे हभप एकनाथ महाराज लोमटे, माजी सभापती विकास बारकुल, भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर महेंद्र भोर, पीएसआय पवन निंबाळकर, आबासाहेब बारकुल, समाधान बारकुल, रंजीत तात्या बारकुल, मंडळअधिकारी नागटिळक , मुख्याध्यापक पौळ सर केंद्रप्रमुख अनिल बारकुल, धनंजय बारकुल, ठोंबरे सर व आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. उपस्थित सर्व मान्यवरांचा व सभासद ग्रामस्थांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला, तसेच कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी शंकरराव बारकुल यांनी संस्थेची सुरुवातीपासून ते आतापर्यंतची वाटचाल सांगितली संस्था बँकिंग बरोबरच सामाजिक कार्यात ही अग्रेसर असते असे सांगितले यावेळी समाधान बेदरे, विकास बारकुल, महेंद्र भोर, एकनाथ लोमटे महाराज यांनी येरमाळ्यासारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेऊन एम एस बी अर्बन पतसंस्थेच्या माध्यमातून कौतुकास्पद काम केल्यामुळे पाचवा वर्धापन दिनाच्यां शुभेच्छा दिल्या  कार्यक्रमाला रमाकांत बारकुल, दत्तात्रय बारकुल, सुग्रीव बारकुल, जब्बार तांबोळी, शंकरराव बारकुल, अजित बेदरे, संदीप बारकुल, देवानंद बारकुल, शशिकांत बारकुल, रमाकांत सावंत यांच्यासह संस्थेचे सभासद मित्रगण गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बारकुल यांनी केले तर आभार समाधान बारकुल यांनी मांनले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.