येरमाळा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लहू बारकुल तर उपाध्यक्षपदी अजय बेदरे यांची निवड

तेरणा काठ वृत्तसेवा:::कळंब तालुक्यातील येरमाळा येथील मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लहू बारकुल यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून अजय बेदरे व सचिव म्हणून बालाजी बारकुल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी धनंजय भैया रणदिवे, संतोष जाधव, राजाभाऊ वैद्य, विलास मुळीक, सुभाष कदम यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच येरमाळा मराठी पत्रकार संघाच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय भैया रणदिवे, जिल्हा सचिव संतोष जाधव, ज्येष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ वैद्य, कळंब तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास मुळीक, सुभाष कदम यांनी केला, जिल्हा मराठी पत्रकार संघ भक्कमपणे तुमच्या सोबत आहे असे आश्वासित केले यावेळी प्रमोद पाटील, सचिन पाटील, संदीप बारकुल, नितीन बारकुल, नागेश तोडकरी, निलेश बारकुल, कुंदन भैय्या कांबळे, समाधान बारकुल, धनंजय बारकुल, रंजीत तात्या बारकुल उपस्थित होते.