धाराशिव साखर कारखान्याचा १२ वा बॉयलर अग्नि प्रदिपन व मोळी पुजन कार्यक्रम संपन्न

डि.व्ही. पी. उद्योग समुह धाराशिव साखर कारखाना लि., चोराखळी युनिट क्र. १ या कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२३ २४ चा १२ वा “बॉयलर अग्नि प्रदिपन व मोळी पुजन कार्यक्रम समारंभ संपन्न झाला
२६/१०/२०२३ रोजी ह.भ.प डॉ. रंगनाथ काकडे महाराज (ढोराळेकर) यांच्या शुभ हस्ते बॉयलर अग्नि प्रदिपन कार्यक्रम तसेच. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर , आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या शुभ हस्ते मोळी पुजन समारंभ संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डि.व्ही. पी. उद्योग समुहाचे संस्थापक व श्री. विठठल स.सा.का. गुरसाळे पंढरपुरचे विद्यमान चेअरमन अभिजीत धनंजय पाटील होते व होमहवन पुजन संचालक संदिप अंबादास खारे व त्यांच्या सुविध पत्नी सौ. भाग्यश्री खारे यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर धनंजय पाटील यांनी केले. ह.भ.प डॉ. रंगनाथ काकडे महाराज यांनी गळीत हंगाम २०२३-२४ यशस्वी पार पडावा याकरिता शुभाशिर्वाद व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यावेळी बोलताना आमदार कैलास घाडगे पाटील म्हणाले की,शेतकरी सभासद, वाहतूक ठेकेदार यांनी चालू हंगामांत धाराशिव साखर कारखाना लि, चोराखळी कारखान्यास जास्तीत जास्त उस गाळपास देण्याचे आव्हान केले.
गेल्या ६ वर्षेपासून शेतक-यांचा विश्वास संपादन केलेल्या कारखान्याने सन २०२३ २४ हंगामाकरिता ऊस बिलाचा पहीला हप्ता २५००/- रु. घोषीत केला तसेच कर्मचारी वर्गासाठी १५ दिवसाचा दिवाळी बोनस जाहीर केला य हंगामात ३ लाख मे.टन गाळप आणि २ कोटी इथेनॉल निर्मीतीचे उद्दीष्ट ठेवल्याचे धाराशिव साखर कारखान्याचे मार्गदर्शक अभिजित पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कारखान्याचे जनरल मॅनेजर ए. एस. पठाण यांनी केले.
यावेळी, कार्यकारी संचालक अमर धनंजय पाटील, सुरेश तात्या सावंत, सर्व संचालक मंडळ, तसेच कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, परिसरातील शेतकरी, सभासद, वाहतुक ठेकेदार, वाहन मालक, इत्यादी हजर होते.