मंगरूळ येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबसमावेत तलाठी यांनी केली दिवाळी साजरी

कळंब/ जयनारायण दरक
कळंब तालुक्यातील तालुक्यातील मंगरूळ येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबसमावेत तलाठी यांनी केली दिवाळी साजरी शासकिय कर्मचाऱ्यांनी एका कुटुंब सदस्या प्रमाणे या कुटुंबसमावेत जो आनंदाचा क्षण साजरा केला त्यात माणुसकीचा झरा दिसला. मयत शेतकरी कै.बालाजी बळीराम डुकरे हे सप्टेंबर महिन्यात सततच्या नापीकिपणाला कंटाळून व कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आपल्या शेतातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती, त्याचा पश्चात तिनं लहान मुले व वृद्ध आई वडील असा परिवार आहे.तलाठी डि.व्ही.सिरसेवाड पाटील यांनी त्यां कुटुंबाचे सांत्वन करत दिवाळी पुर्वी त्यांना शासनाकडून अतिवृष्टी अनुदान मिळवून दिले. तसेच त्यांना दिवाळी साठी फराळाचे सामान व सर्व कुटुंबास कपडे व इतर साहित्य स्वखर्चाने खरेदी करून दिले.व त्या कुटुंबाला धीर देत त्यांच्या सोबत दिवाळी सण साजरा केला. प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपल्या वाईट परिस्थितीला खचून न जाता येणाऱ्या संकटाला सामूहिकरीत्या धैर्याने तोंड द्यावे, संकटकाळात एकमेकाला मदत करावी.कुठलेही काम असेल तरी एका कुटुंबातील सदस्य प्रमाणे आपली अडचण सांगावी.असे तलाठी यांनी सांगितले. तसेच गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट देऊन त्यांना राशन धान्य मिळते का, शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला का, व इतर शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ते नेहमी धडपड करत असतात. या कामगिरीमुळे गावकरी बांधवांनी तलाठ्यांचे कौतुक केले.