ताज्या घडामोडी

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची आखाडापूजनासह स्पर्धेची सुरुवात

धाराशिव : श्री तुळजाभवानी क्रीडासंकुल १६ ते २० नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न होणाऱ्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आखाडापूजनासह स्पर्धेची सुरुवात धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ . सचिन ओंम्बासे , जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
धाराशिव जिल्ह्यात प्रथम भव्यदिव्य अशा ५ संख्या असलेल्या कुस्ती आखाडा २ मातीचे ३ मॅट या स्वरुपात स्पर्धेचे आयोजन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या पुढाकाराने होत असून या स्पर्धेचे मुख्य कार्यवाहक तथा युवा उदयोजक, युवा नेते अभिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि . १६ ते २० नोव्हेंबर दरम्यान होत आहे . धाराशिवकरांना भव्यदिव्य अशी कुस्ती स्पर्धा अनुभवायला मिळणार आहे .
या आखाडा पूजनाला आयोजक सुधीर पाटील , मुख्य कार्यवाहक तथा युवा उदयोजक अभिराम पाटील, अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार , जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे , जिल्हा नियोजन अधिकारी झाडे साहेब , धाराशिव नगर पालिका मुख्याधिकारी वसुधा फड , धाराशिवचे तहसिलदार डॉ . शिवानंद बिडवे तसेच मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी सौ. अस्मिता ओंम्बासे , आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ .प्रेमाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील
तसेच कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे , धाराशिव शिवसेना जिल्हा प्रमुख सूरज सांळुखे , जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे , भाजपा प्रदेश कार्यकरणी सदस्य सतीश बप्पा देशमुख , तुळजाभवानी अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय पाटील , प्रवीण पाठक , अखिल भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ.चंद्रजित जाधव , रहेमान काझी , सतीश इंगळे , चौरे साहेब , शिवाजीराव पंगुडवाले , शिला उंबरे , पोलीस निरीक्षक बांगर साहेब , सहायक पोलीस उपनिरीक्षक माळी साहेब ,शहर पोलीस निरीक्षक शेख साहेब ‘ तसेच सर्वपक्षीय कुस्ती मल्ल मान्यवर यांची उपस्थिती होती .

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.