महिला काय करू शकतात हे अहिल्यादेवींनी जगाला दाखवून दिले–प्रा.भिंगे

तेरणा काठ वृत्तसेवा –मल्हारराव होळकरांनी महिलांना जे स्वातंत्र दिले तसे आपणही आपल्या घरातील महिलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. महिला काय करू शकतात हे अहिल्यादेवींनी जगाला दाखवून दिले आहे असे गौरवोद्गार कळंब तालुक्यातील चोराखळी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात प्रा. यशपाल भिंगे यांनी व्यक्त केले .
दि. २६ सोमवार रोजी चोराखळी येथील जय मल्हार युवा प्रतिष्ठान आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने येथील पापनाश मंदीरातील सभागृहामध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी शाळेतील मुलींनी अहिल्यादेवींविषयी आपली मनोगते व्यक्त केली . यानंतर प्रा. भिंगे बोलताना म्हणाले की, धनगर समाजाने आपापसातील पोट शाखेतील मतभेद मिटवले पाहिजेत. आपण सर्व एकच आहोत. मुला – मुलींना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन जबाबदार नागरिक बनवा. मुलं व्यसनी बनणार नाहीत असे संस्कार त्यांना लहानपणापासूनच द्या . अहिल्यादेवींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर जिवनातील कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल.
गावातील विविध परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला . यावेळी डॉ. रामकृष्ण लोंढे, प्रा. सोमनाथ लांडगे, कमलाकर दाने, प्राचार्या श्रीमती पैकेकर मॅडम, कवडे सर, दिगंबर मैंदाड, खंडेराव मैंदाड, सीमाताई सोनटक्के, गोपीनाथ मैंदाड, विश्वंभर मैंदाड, ॲड. रविंद्र मैंदाड, ॲड. श्रीकांत मैंदाड, चंद्रकांत कोकाटे, बाजीराव चौरे, ॲड. वाघमारे, मिराजी मैंदाड,ह.भ.प. नामदेव वाघमोडे, तुळशीदास मैंदाड, भुजंग लोकरे, आझाद शेख, नागनाथ साचणे, पांडुरंग मैंदाड, झेलम शिंपले, विठ्ठल खटके, अभिमान लिखे, अमोल मैंदाड, श्रावण इटकर, अंबादास शिंदे, काकासाहेब सोनटकके, संभाजी मैंदाड, अजित गायके, नागेश मैंदाड, बंटी मैंदाड, ज्योतीताई जगताप, राणी शिंदे, सुनिता स्वामी, रणरागिनी झेलम, ॲड. वाघमारे ताई, ॲड. छाया मैंदाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सोमनाथ लांडगे यांनी केले. सुत्रसंचालन संजय नवले यांनी आभार प्रदर्शन गोपीनाथ मैंदाड यांनी केले .