ताज्या घडामोडी
येडूआई भाविकांच्या मनोकामना पूर्ण कर

तेरणा काठ वृत्तसेवा —
अख्या महाराष्ट्राला नवसाला पावणारी देवी म्हणून सुपरिचित असणारी येरमाळ्याच्या येडाईचा चैत्र पौर्णिमा उत्सवातील मुख्य कार्यक्रम चुना वेचण्यासाठी लाखो भाविकांनी उपस्थित राहून पालखीवर चुना वेचला देवीची पालखी चुन्याचा रानात आल्यावर पालखीवर आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यामार्फत हेलीकाॅप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी बोलताना आ. राणा पाटील म्हणाले की, रखरखत्या ऊन्हात देवीच्या पालखीवर चूना टाकण्यासाठी मनोभावे भाविक लाखोंच्या संख्येने उपस्थित आहेत येडाई देवीवर असणारी श्रध्दा व विश्वास निर्माण करतो.तरी आई येडूसरीने भाविकांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात अशी प्रार्थना केली.