ताज्या घडामोडी

जागृत देवस्थान बाभळगावची मेसाई देवी: यात्रेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी

बोलक्या सोंगाची परंपरा बाभळगावकरांनी जपली.

तेरणा काठ वृत्तसेवा .दहिफळ-प्रतिनिधी योगराज पांचाळ —कळंब तालुक्यातील बाभळगाव चे ग्रामदैवत श्री मेसाई देवस्थान जागृत असुन मेसाई देवी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे.
देवीची यात्रा चैत्र महिन्यात कालाष्टमी या दिवशी भरते.मेसाई देवी भाविकांच्या नवसाला पावणारी देवी असून यात्रे दिवशी आपला नवस फेडण्यासाठी सकाळ पासून भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात .हे देवस्थान पुरातन असून तीर्थक्षेत्राचा ‘ क’ दर्जा मिळाला आहे.यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरा शेजारी निवासस्थान बांधलेले आहे.सकाळी देवीला महाअभिषेक करून यात्रेला सुरुवात होते.
बाभळगावची मेसाई देवी परिसरात नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते.अनेक भक्त आपल्या मनोकामना देवीला बोलून दाखवतात.वर्षभरात मनोकामना पूर्ण होतात.भक्त देवीला बकऱ्याचा बळी देतात.पावणेरावुळेंना मेसाई धार्जिण आहे.बाहेर गावातुन येऊन गावात स्थीर झाले व्यवसाय करून मोठे झाले म्हणून आज ही मेसाई देवी पाहुणे रावुळे यांना पावते अशी नागरिकांची भावना आहे.
यात्रेत जिल्हाभरातून भाविक येतात.वर्षातून येणारी हि यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करतात .यात्रेनिमित्त रात्री भव्य सोंगाचा कार्यक्रम असतो .या सोंगाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पात्र बोलके असते .रामायण, महाभारत,शिवकालीन,सामाजिक विषयावर सोंग नटवले जातात.यात कलाकार आपली कला सादर करतात.सोंगे पाहण्या साठी परिसरातील नागरिक तुफान गर्दी करतात.यंदा यात्रा कमिटीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.यात्रेनिमित्त रात्री १२ वा. पारंपरिक सोंगाचा कार्यक्रम असतो.या सोंगाचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक वर्षांपासून बैलगाड्यातून विविध पौराणीक कथेवर आधारित सोंगे नटवून गावातून मिरवणूक काढली जाते.प्रत्येक सोंगात डायलॉग असतात.प्रत्येक्ष युद्धाचा प्रसंग साकारला जातो.शंकर,राम, लक्ष्मण,रावण, गणपती,राजा राणी हत्ती, असे विविध सोंगे साकारलेली जातात.प्रत्येक वर्षी एक सोंग एक कलाकार नटवितो.जवळपास २० वर्ष,४० वर्षांपासून एकाच व्यक्तींनी एक सोंग काढले आहेत.बोलक्या सोंगाची परंपरा बाभळगावकरांनी जपली आहे.
यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे ही सोंगे होय.यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा कार्यक्रम होणार आहे.तसेच प्रसिद्ध गायिका कोमल पाटोळेंचा कार्यक्रम होणार आहे.तरी परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.