अभिमान शेजाऱ्यांचा वसाहतीमधील नागरिकांनी मिळून केला गुणवंतांचा सत्कार

तेरणा काठ वृत्तसेवा —
कळंब तालुक्यातील येरमाळा येथील छत्रपती संभाजी महाराज नगर वसाहतीच्यावतीने आणि सोमनाथ बारकुल, मनोज बारकुल हरिश्चंद्र लाटे यांच्या संकल्पनेतून इयत्ता दहावी मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
इयत्ता दहावी मध्ये उत्तुंग यश संपादन करून येरमाळा येथील कुमारी जाधव अंतरा संतोष 97.20 %कुमारी जाधव विभावरी अविनाश 94.40% कुमारी शेख सोया शकील 93% कुमारी बारकुल अनुष्का वसंत 90% कुमारी बारकुल अनुष्का मनोज 88.40%कुमारी दिवाणी अक्षरा प्रकाश 87.7% कुमारी उघडे रेणुका अभिमन्यू 82.20% कुमार उघडे अभिजीत संभाजी 82.20% कुमारी खेरमोडे राजकन्या राजेंद्र 81.5 %कुमारी आरती दत्ता 81.20% कुमार बारकुल आदित्य सतीश 79.% कुमार उघडे प्रथमेश बाळासाहेब 77.% आदी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून या विद्यार्थ्यांचे पालक हे मजुरी घरकाम अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱे असून या विद्यार्थ्यांनी वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत यश संपादन केल्याबद्दल छत्रपती संभाजी महाराज नगर वसाहतीच्या वतीने त्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी मनोज बारकुल ,सोमनाथ बारकुल ,अभिमन्यू उघडे, संभाजी उघडे ,तानाजी सवणे, गणेश वाघमारे ,कश्मीर शेख, नवनाथ बारकुल, हरिश्चंद्र लाटे ,माजीद शेख ,लिंबराज कोकाटे , संतोष आगलावे, सूर्यकांत पेजगुडे, इमरान शेख, सुरज कलसाईत, गणेश बारकुल, बारकुल, हनुमंत कोकाटे, परसराम बारकुल यांच्यासह पालक, महिला पालक ग्रामस्थ उपस्थित होते