ताज्या घडामोडी
नवनियुक्त कळंब शहर भाजपा अध्यक्ष पाटील यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार

तेरणा काठ वृत्तसेवा
(कळंब-धनंजय घोगरे) धाराशिव भाजपाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दत्ता (भाऊ) कुलकर्णी यांनी कळंब तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर केली त्यामध्ये कळंब शहर भाजपा अध्यक्षपदी मकरंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे पाटील यांच्या निवडीबद्दल कळंब तालुका पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष परमेश्वर पालकर कळंब तालुका मराठी पत्रकार मंडळाचे अध्यक्ष धनंजय घोगरे यांनी सत्कार केला यावेळी कळंब तालुका भाजपा सरचिटणीस संजय जाधवर,पत्रकार प्रवीण तांबडे,परशुराम देशमाने आदी उपस्थित होते