डॉ. सुधीर झिंगाडे यांच्या चुकीच्या उपचराचा. आकाश चव्हाण यांना फटका जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार

तेरणा काठ वृत्तसेवा –डॉ. सुधीर झिंगाडे यांच्या चुकीच्या उपचराचा. आकाश चव्हाण यांना फटका जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
तक्रारी अर्जात नमूद केले आहे की आकाश गोरोबा चव्हाण, मु.पो. रूईभर हे ०१ जून २०२५ रोजी माझ्या पोटात दुखत असल्यामुळे माझे वडिल व आत्याच्या मुलगा हे दोघे मला घेवून डॉ. सुधीर झिंगाडे यांच्या दवाखान्याच्या ठिकाणी आले. नंतर डॉ. झिंगाडे यांनी मुतखडा आहे. असे सांगितले व मला उपचारासाठी औषधे अआणण्यासाठी सांगितले व चिट्ठी लिहून दिली. पण मी त्यांना सांगितले माझे फक्त पोट साफ झाले नाही तुम्ही खूप औषधे लिहून देत आहात पण वडील व आत्याचा मुलगा माझ्या पोटत दुखत असल्यामुळे त्यांनी ते औषधे घेवून आले व ते डॉक्टरांनी सलाईनद्वारे मला दिले व मला घरी जाण्यासाठी सांगितले व मी घरी आल्यानंतर माझ्या पोटा खुप जोराने दुखू लागले. माझे हातपायत थरथर कापत होते त्यांनतर मला उलटी झाली, व नंतर मला चक्कर येवू लागली त्यानंतर मला बेशुध्द अवस्थेत वडिलांनी व चुलत भावाने डॉ. भारत माने यांच्याकडे मला उपचारासाठी आणले परंतू रविवार असल्यामूळे त्यांची भेट झाली नाही. नंतर मला सिव्हील हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. तेथे अॅडमीट केल्यानंतर सोनोग्राफी व एक्सरे काढण्यात आला त्यात असे आढळले स्वादू पिंडावर सूज आली असे आढळून आले पण पोटात जास्त दुखू लागले त्यामुळे मंगळावारी तेथून स्वतःहून तेथून डिस्चार्ज घेतला व डॉ. भारत माने यांच्याकडे अॅडमीट झालो. नंतर त्यांनी सिटी स्कॅन काढण्यात सांगितले व सिटी स्कॅन काढल्यानंतर त्यात ही स्वादु पिंडात सुज व साईडला पाणी झाल्याचे समजले व मी तेथून पुढे ३जून ते ११ जून या कालखंडामध्ये डॉ. भारत माने यांच्या परीस हॉस्पीटल मध्ये अॅडमीट झालो. व त्यांनी योग्य ती ट्रिटमेंट दिल्यामूळे मी आजारातून सुखरूप बाहेर आलो.
डॉ. झिंगाडे यांनी अयोग्य ट्रिटमेंट दिल्यामुळे खुप मोठया जिव घेण्या त्रासाला सामोरे जावे लागले. अशा प्रकारे बेंबळी येथील व परिसरातील खेडे पाडयातील लोकांना देखील चुकीची ट्रिटमेंट मिळत असल्याचे दिसून येत आहे. तरी या डॉक्टरवर योग्य ती कारवाई करा अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्गा अवलंबेन आणि स्वतःच्या न्यायासाठी लढा देईन असे तक्रारी अर्जात लिहिले आहे.