रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहन चालक व नागरिकांची आरोग्य तपासणी

धाराशिव
:-रस्ता सुरक्षा सप्ताह 2024 उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव व जिल्हा पोलीस विभाग, धाराशिव यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 15 जानेवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये जिल्हाभर राबविण्यात येत आहे. सदरील अभियानांतर्गत दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी खालील प्रमाणे कार्यक्रम राबविण्यात आले.
सकाळी 10.30 ते 3.00 – जिल्हा शासकीय रुग्णालय, धाराशिव व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानांर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव येथे कार्यालयात येणा•या वाहनचालक, नागरीक, अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
सदरील शिबीरामध्ये सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री राहुल जाधव यांनी उपस्थित असलेल्या बसचालक, खाजगी वाहन चालक, ट्रान्सपोर्ट वाहन चालक यांना रस्ता सुरक्षाच्या अनुषंगाने वाहनचालकांचे नेत्र व आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी वेळो-वेळी तपासणी केली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय, धाराशिव व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानांर्गत दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले असून जास्ती जास्त संखेने वाहन चालकांनी नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले.
सदरील शिबीरास धाराशिव जिल्हा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष श्री मौनोद्दिन पठाण व रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री जमाल तांबोळी, शासकीय रुग्णालय धाराशिव येथील वौद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता भोसले (फिजीशीअन), डॉ. परितोष करुंद (सर्जन), डॉ. विकास बाराते (अस्थिरोग तज्ञ) व शुभम जाधव (नेत्र चिकीत्सा अधिकारी) व रुग्णालयातील स्टाफ नर्स प्रतिक्षा प्रदिप जगदाळे, सोनाली वाघमारे, क्रांती सपकाळ व शुभम दिलीप जाधव (Optometrist) यांच्या उपस्थितीमध्ये 67 वाहनचालकांची तसेच अधिकारी कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री सिध्देश्वर मस्के, सहा. मोटार वाहन निरीक्षक यांनी केले आभार श्री कुणाल होले यांनी मांडले. या प्रसंगी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक श्री एम.जी.सी. शेख, श्री प्रसाद पवार, श्री श्रीकांत शिंदे, श्री मारुती चौगले, श्री दत्तात्रय पांडकर, तसेच सहा. मोटार वाहन निरीक्षक श्री अजित पवार, श्री कुणाल होले, श्रीमती पुनम पोळ व कार्यालयातील वरिष्ठ श्री डी.के. लोंढे, कार्यालयीन अधिक्षक व कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती होती.
दुपारी 12.00 ते 1.30 शिबीर कार्यालय, भूम – शिबीर कार्यालय वाशी येथे शिबीरा दरम्यान मोटार वाहन निरीक्षक श्री प्रशांत भांगे यांनी शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्ती काढण्यासाठी आलेल्या शिकाऊ 47 व पक्की 45 अनुज्ञप्ती धारकांना रस्ता सुरक्षाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले तसेच यावेळी रस्ता सुरक्षा विषयक सिग्नलची माहिती, आपघात कमी करण्यासाठी करावयाच्या उपाय योजना याविषयीचे माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले.
****