ताज्या घडामोडी

अखिल भारतीय हिंदु खाटीक संघटनेच्या कळंब तालुकाध्यक्षपदी जयवंत पलंगे यांची निवड

तेरणा काठ वृत्तसेवा 

अखिल भारतीय हिंदु खाटीक समाज या  संघटनेच्या कळंब तालुकाध्यक्षपदी येरमाळा येथील जयवंत पलंगे यांची निवड करण्यात आली . संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार निचळे यांनी जयवंत पलंगे यांची त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यातील योगदान, संघटन कौशल्य  याची दखल घेऊन त्यांची कळंब तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे . संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रमेश रघुनाथराव जाधव आणि सर्व वरिष्ठांच्या सम्मतीने जयवंत पलंगे यांना तालुकाध्यक्ष पदाच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले . त्यांच्या या निवडीमुळे येरमाळा खाटीक संघाच्या वतीने जयवंत पलंगे यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले .यावेळी संजय निचळे , बापू जमदाडे , सतिष निचळे , तुषार रुमने ,नरेश निचळे ,अमर पलंगे , धनाजी निचळे ,किरन कोथिंबिरे गणेश पलंगे , अक्षय घोलप , विशाल पलंगे ,रुकेश पलंगे आदी सर्व समाज बांधव उपस्थित होते .

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.