ताज्या घडामोडी
मंगरूळ येथील अभयराजे रमेश भोसले यांची जलसंपदा विभागामध्ये सिव्हिल इंजिनिअर सहाय्यकपदी निवड

कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील अभयराजे रमेश भोसले यांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये सिविल इंजिनियर सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. अभयराजे भोसले हे बोलताना म्हणाले की, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात धैर्याची फार गरज असते. ज्या ज्या वेळी मी खचलो मला माझ्या वडिलांनी व कुटुंबाने आधार दिला खरंतर हे यश माझे नसून माझे वडील व कुटुंबाचे तसेच मित्र परिवाराचे आहे.