ताज्या घडामोडी

शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त पालखीची वाजतं गाजत ढोल ताशांच्या गजरात गावभर मिरवणूक

तेरणा काठ वृत्तसेवा**  येरमाळा येथील मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या माध्यमातून पालखी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गावभर मिरवणूक काढण्यात आली.

गावातील महिलांनी आपापल्या दारात सुंदर अशा रांगोळीचा आरास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे स्वागत औक्षण करून केले तसेच जागोजागी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सर्व गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले पालखी सोहळ्यामध्ये ज्ञानोद्योग विद्यालयाचे  सर्व विद्यार्थी विविध वेशभूषा परिधान करून लेझीम ,ढोल पथक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात पालखी सोहळा संपन्न झाला तसेच शिवजन्मोत्सवाचा औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे रक्तदात्यांना येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय संस्थेमार्फत शिवप्रतिमा भेट देण्यात आली यावेळी अनेक तरुणांनी रक्तदान करून शिवजन्मोत्सव साजरा केला

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.