येडशी येथील माजी सभापती संजय काका लोखंडे, तुषार शिंदे व इतरांची निर्दोष मुक्तता

. जिल्हा व सत्र न्यायाधीश, उस्मानाबाद यांनी ग्रामीण पोलिस स्टेशन धाराशिव येथे भा. द.वी. कलम 326, 329, 147, 148 ,149 प्रमाणे दाखल असलेल्या प्रकरणामध्ये एकूण सहा लोकांची निर्दोष मुक्तता केली. सदरचा गुन्हा येडशी येथे घडलेला होता व या प्रकरणात येडशी येथील माजी पंचायत समिती सभापती संजय काका लोखंडे, ग्रा. प. सदस्य तुषार शिंदे, प्रशांत जगताप तसेच इतर 3 जनविरुद्ध सत्र न्यायालय धाराशिव येथे प्रकरण दाखल होते.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की दि. 31.3 15 रोजी फिर्यादी सुनील शेळके यांनी ग्रामीण पोलिस स्टेशन धाराशिव येथे माजी सभापती संजय काका लोखंडे, तुषार शिंदे, प्रशांत जगताप व इतर तीन व्यक्तीविरुद्ध त्यांना हॉटेल रुद्र समोर मारहाण केली व सोन्याचे 2 तोळ्याचे लॉकेट, 5000 रुपये व मोबाईल घेतला. त्यानंतर फिर्यादी नाना डीसले यांचेसोबत ते त्यांचे नातेवाईकांचे जवळा येथील गावी जात असताना आरोपी तुषार शिंदे, प्रशांत जगताप व इतर लोकांनी रस्त्यात अडवून फिर्यादीचे मांडीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले तसेच सोबत असलेल्या नाना डीसले यांच्या गळ्यावर तलवारीने वार करून गंभीर जखमी करून जीव मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास psi जिरगे यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. तथापि धाराशिव येथील . सत्र न्यायाधीश श्री. मोहिते साहेब यांचे समोर सदर प्रकरणात आरोपीकडून मांडलेली बाजू व युक्तिवाद ग्राह्य सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. आरोपींचे वतीने ॲड. रविंद्र मैंदाड यांनी काम पाहिले. ॲड. सारंग वडगावकर, ॲड. दशरथ कोळेकर, ॲड. राम राऊत, ॲड. श्रीकांत माळी, ॲड. आकांक्षा माने मॅडम, ॲड. इंगळे मॅडम यांनी सहकार्य केले.