ताज्या घडामोडी

युवा महोत्सवात प्रतिक गायकवाडचे यश

कळंब/जयनारायण दरक –
दिनांक ४ ते ७ अॅाक्टोबर २०२३ या कालावधीत डॅा.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर चा केंद्रीय युवक महोत्सव पार पडला. विद्यापीठाअंतर्गत असलेल्या मराठवाड्यातील सर्व महाविद्यालयांनी या युवक महोत्सवात सहभाग नोंदवला,विवीध कलाप्रकारात विद्यार्थी कलावंतानी आपली कला सादर केली.रामकृष्ण परमहंस महाविदयालय,धाराशिव येथे एम.कॅाम द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी प्रतिक प्रकाश गायकवाड याने वक्तृत्व स्पर्धेतील आपले वर्चस्व कायम ठेवले ,आतापर्यंत झालेल्या विद्यापीठाच्या युवक महेत्सवांमधील प्रतिकचे वक्तृत्व,काव्यवाचनव वादविवाद या कलाप्रकारांमधील हे पाचवे यश आहे.दीडशे पेक्षा जास्त महाविद्यालयांचा समावेश वक्तृत्व स्पधेत होता.आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीच्या जोरावरती प्रतिकने ‘’चंद्रावर पोहचलो आता पुढे काय ?’’ या विषयाची मुद्देसुद व अभ्यासु मांडनी केली व घवघवीत यश प्राप्त केले.प्रसिद्ध सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर ,अभिनेता प्रविणकुमार दाळींबे,कुलगुरु प्रो.डॅा.प्रमोद येवले इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.या यशाबद्दल धाराशिव चा युवावक्ता प्रतिक गायकवाड चे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.