जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांनी समितीकडे ऑनलाइन अर्ज करावेत
शैक्षणिक वर्षात इयत्ता 11 व 12 वी विज्ञान शाखेत शिकणा-या व सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणा-या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी समितीकडे संपुर्ण कागदपत्रांसहित तात्काळ अर्ज सादर करावेत. विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र पुढील शिक्षणासाठी वेळेत मिळेल. विद्यार्थ्यांनी www.barti. Maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी असलेला जात पडताळणीचा अर्ज ऑनलाइन भरावयाचा आहे. त्याची प्रिंटआऊट काढून घ्यावी. त्याबरोबर आवश्यक ते सर्व शैक्षणिक, महसुली पुरावे व साक्षांकित प्रती जोडून अर्ज जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, धाराशिव कार्यालयात समक्ष सादर करावा. येताना सर्व मुळ कागदपत्रे आणावीत. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. बी. जी. पवार यांनी केले आहे.
****