ताज्या घडामोडी

होमहवन विधीवत पूजेने नवरात्र महोत्सवाची सांगता

श्री येडेश्वरी देवीच्या मंदिरात सोमवार अश्विन शुद्ध नवमी निमित्त होमहवन विधी पार पडला. कोहळ्याची पूर्णाहुती व येडाई देवीला पुरणपोळी व कडकण्याचा नैवेद्य दाखविण्यात येऊन नवरात्रीची सांगता करण्यात आली.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.या काळात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आदी भागा- तील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आई राजा उदो उदो च्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणला होता. नवमीनिमित्त देवीच्या तांदळावर बकाड्या लिंबाच्या पत्रीच्या पानाने बारवाची महापूजा मांडण्यात आली होती.सोमवारी पहाटे सहा वाजता सुर्योदयावेळी देवीचे मानकरी यशवंत पाटील व अमोल पाटील यांच्या हस्ते होम हवन पूर्णाहुती महायज्ञ पुजा पार पडली. यानंतर होमा मध्ये कोहळ्याची पूर्णाहुती देऊन, देवीच्या गाभाऱ्यातील मंदिर परिसरातील दत्त मंदिर
मंदिर, श्री भगवान शंकर मंदिर, श्री नरसिंह मंदिर, श्री जानाई देवी मंदिर, श्री भैरवनाथ मंदिर, श्री खंडोबा मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर, सीतामाता ठाणं, श्री मातंगी माता मंदिर आदी देव देवतांना पुरण- पोळी कडकण्याचा नैवेद्य दाखवण्यासाठी मानकरी, गावातील ग्रामस्थ, पुजारी, आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवार पहाटे सहा वाजता होम-हवन पूर्णाहुती पारण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी होममध्ये बकराबळी ला पूर्णपणे फाटा देऊन होमामधे सूर्योदयाच्यावेळी कोहळ्याची पूर्णाहूती देण्यात आली. यावेळी, सुभाषराव पाटील, प्रा. सुनील (बापू) पाटील, मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष बापूसाहेब बेदरे, उपाध्यक्ष संजय आगलावे, सचिव राजभाऊ बेदरे, सच्चिदानंद बोधले महाराज, परशुराम गुरव, ऋषी बेदरे, विकी बेदरे,, गिरीश कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील तसेच ग्रामस्थ यांच्यासह भाविक उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.