ताज्या घडामोडी

आर.पी.कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.शेख गाझी यांना ऑस्ट्रेलियन सरकारचे पेटंट प्रदान

धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते सन्मान

धाराशिव प्रतिनिधी

डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील आर.पी.औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेख गाझी यांना ऑस्ट्रेलियन सरकारने “टी मेझ ॲपरेटर्स फॉर डिक्टेशन ऑफ लोकोमोटर ऍक्टिव्हिटी” या पेटंटला मान्यता दिली.डॉ. शेख गाझी हे गेल्या 21 वर्षापासून अविरत अध्यापनाचे कार्य करत आहेत.त्यांच्या नावे 50 पेक्षा जास्त रिसर्च पेपर आहेत. तसेच 60 पेक्षा जास्त शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केले आहेत. त्याचबरोबर ते विविध फार्मसी जर्नलच्या संपादकीय मंडळावर कार्यरत आहेत.32 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एम.फॉर्म प्रोजेक्ट साठी मार्गदर्शन केले आहे व सहा विद्यार्थी पी.एचडी साठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत.या अगोदरही त्यांचे एक पेटंट प्रसिद्ध झालेले आहे ज्याला ऍथॉरिटी ऑफ इंडियाने मान्यता दिलेली आहे. हे त्यांचे दुसरे पेटंट आहे.सदर पेटंट मुळे रुग्णाच्या मेंदूवरती विविध लोकोमोटर नर्व मध्ये काय बदल होतात याचा अभ्यास डॉ. गाझी यांनी केलेला आहे. त्याचबरोबर विविध मनोरुग्ण वा झोप येण्यासाठी सदर अभ्यास पुष्कळ उपयोगी होऊ शकतो.या कार्याची दखल म्हणून धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी अभिनंदन करुन सत्कार केला.या सत्कार प्रसंगी बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की,आमच्या महाविद्यालयासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.तुमच्या अनुभवाचा व कार्याचा फायदा महाविद्यालयाचा दर्जा उंचावण्यासाठी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य व प्राध्यापक वृंद व इतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.