रुईभर मध्ये पुढार्याला गावबंदी..व सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात

तेरणाकाठ न्युज धाराशिव (प्रतिनिधी) आकाश चव्हाण
मराठा आरक्षणाचा तिढा कायम राहिल्याने संतापलेल्या रुईभर येथील सकल मराठा समाज बांधवांनी पुढार्यांना गावबंदी केली आहे. यामध्ये लहान मुलांचा देखील खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आता तरी मायबाप सरकारने जागे व्हावे व मराठा समाजाला आरक्षण द्यावे.
तीन महिन्यापूर्वी सर्वप्रथम येडशी येथील मराठा बांधवांनी आमदार खासदार आणि मंत्र्यांना गावबंदी केली होती याचीच पुनरावृत्ती अन्य गावांमध्ये झाली. आता रुईभर मध्ये सकल मराठा समाज आरक्षण प्रश्नावर एकवटला आहे.
सकल मराठा समाज, रुईभर यांच्याकडून जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही.
तोपर्यंत सर्व आमदार,खासदार, मंत्री व सर्व पक्षांचे पदाधिकारी यांना रुईभर गावामध्ये प्रवेश बंद केला आहे.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.शांततामय मार्गाने जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे.
तसेच गेल्या तीन दिवसापासून पासून रुईभर येथील सकल मराठा समाजाने साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.