आरक्षणासाठी येरमाळा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर- खामगाव राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन

आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी येरमाळा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने दि.29 ऑक्टोबर पासुन साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज उपोषणाच्या दुस-या दिवशी पंढरपूर खामगाव राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . त्याचबरोबर आरक्षण मिळेपर्यंत आजी माजी मंत्री, खासदार व आमदारांना शहरबंदीही करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या आंदोलनाची दाहकता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री, आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून टायर जाळून सरकारचा मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला . यावेळी लहान विद्यार्थांनी आणि सुशिक्षीत बेरोजगार तरुणांनी आपल्या भाषणातून आरक्षण देण्याची मागणी केली . यावेळी एस . टी . सारख्या ज्या सरकारी मालमत्ता आहेत त्यांचे आंदोलन करत असताना नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले . आजच्या रास्ता रोको आंदोलनात विद्यार्थ्यांसह, युवक व वयोवृद्ध सुद्धा सहभागी झाले होते .