ताज्या घडामोडी
येरमाळ्यात मराठा आरक्षणासाठी महिलांचे साखळी उपोषण

येरमाळा येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी म हिलांनीही सहभाग घेतला. मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या आमरण उपोषणला समर्थन म्हणून येरमाळा येथे महिलांनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी मराठा समाजाला आरक्षणाची का गरज आहे हे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले व लवकरात लवकर सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडवुन त्यांचा जीव वाचवावा, अशी विनंती केली.