ताज्या घडामोडी

खामसवाडी येथे मराठा आरक्षणासाठी महिलांचा कॅन्डल मार्च तर १०१ युवकांनी केले मुंडन

जयनारायण दरक/कळंब

कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी दि.३०ऑक्टोंबर रोजी रात्री शेकडो महिलांनी कॅन्डल मार्च काढून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं , जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौका पासुन कॅन्डल मार्चला सुरूवात करण्यात आली.त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौक, जगदंबा चौक, श्रीराम मंदीर, हनुमान मंदीर, या मार्गाने संपुर्ण गावांमध्ये कॅन्डल मार्च काढून घोषणाबाजी करण्यात येऊन याची सांगता छ. संभाजी महाराज चौकामध्ये करण्यात आली. या मध्ये मराठा समाजासह इतर जाती धर्मातील महीलांनीही सहभाग नोंदवून मराठा आरक्षणाला पाठींबा दर्शविला. त्यामुळे खामसवाडी नगरी घोषणाबाजीने व दिव्यांच्या लखलखाने दुमदुमली होती. त्यानंतर मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी पाच दिवसापासून साखळी पासून चालू आहे .
मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी अनेक उपोषणे आंदोलने करून ही उपोषण मिळत नसल्यामुळे आज दि.३१ऑक्टोंबर रोजी सकाळी सामूहिक रित्या मराठा समाजातील बांधवांनी प्रशासनाच्या निषेधार्थ (१०१) युवकांनी मुंडन करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.