ताज्या घडामोडी

मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराज यांची निर्दोष मुक्तता

तेरणा काठ न्युज
श्री दत्त देवस्थान ट्रस्ट मलकापूर येथील एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांचे विरुद्ध सन 2017 मध्ये अतुल मुंढे याना त्वचा रोग झाल्याचे सांगून व करणी भानामती काढतो म्हणून 1100 रुपये घेऊन त्यांचे घरी जाऊन नारळ वैगरे बाधून पूजा केली होती.परंतु कोणताही फरक पडला नसल्याने त्यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती पोलिसांनी कोणतीही दखल न घेतल्याने सदर प्रकरण कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन न्यायालयाने दाखल करून घेतले होते. व त्याप्रमाणे दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी धाराशिव यांनी आनंदनगर पोलिस स्टेशन धाराशिव येथे सन 2017 मध्ये श्री दत्त मंदिर संस्थान मलकापूर ता. कळंब, जि. धाराशिव येथील संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले  एकनाथ महाराज लोमटे यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात सदर गुन्ह्यात    संपूर्ण साक्षीदारांचे जवाब व आरोपीचे वकील ॲड. रवींद्र मैंदाड यांचा युक्तिवाद ऐकून घेऊन त्यांची निर्दोष मुक्तता केली. सदर गुन्ह्यात आरोपी असलेले एकनाथ लोमटे महाराज यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवत त्यांना निर्दोष मुक्त केले. सदर प्रकरणात युक्तिवाद कामी ॲड. सारंग वडगावकर, ॲड. सोनाली गुडे मॅडम, ॲड. श्रीकांत माळी, ॲड. आकांक्षा माने मॅडम, ॲड. अमित लांडगे, ॲड. दीपा इंगळे मॅडम तसेच अजित कासार व सूरज घोडके यांनी सहकार्य केले..

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.