ताज्या घडामोडी

अजिंक्य बहुउद्देशीय संस्था खडकी व भटके विमुक्त विकास परिषद यांच्या वतीने भटके विमुक्त बांधवांना फराळाचे वाटप

अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खडकी व भटके विमुक्त विकास परिषद धाराशिव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापुर तालुक्यातील 200 भटके विमुक्त समाज बांधवांसोबत त्यांच्या पालावर वस्तीवर जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करुन साजरी करण्यात आली.

यावेळी राम जवान बोलताना म्हणाले की अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गेल्या सात वर्षांपासून भटकंती करणार्या समाज बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात येते हीच परंपरा संस्थेने पुढे सुरू ठेवली आहे. यामध्ये मेंढपाळ बांधव, वैदु समाज बांधव, डवरी गोसावी समाज बांधव, ऊसतोड कामगार बांधव, पारधी समाज बांधव, यांच्या पालावर वस्तीवर जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करुन त्यांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. त्यांचे प्रश्न पुढील काळात शासन दरबारी मांडुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रयत्न करणार असल्याचे राम जवान यांनी बोलताना सांगितले.
यावेळी लक्ष्मण सुपनार सर, शालिवाहन वाघमोडे सर, सिध्दाराम सुरवसे, विठ्ठल भंडारे, आविनाश जवान यांच्यासह भटके विमुक्त समाज बांधव उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.