ताज्या घडामोडी

खामसवाडी येथे रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा वाटप

 

कळंब/जयनारायण दरक

कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे दिपावली सणाच्या निमित्ताने दि.१२नोव्हेंबर रोजी स्वस्त धान्य दुकाना मधून आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. सदरील योजनेचे वाटप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन श्री.संजय भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा वाटप योजना सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे सदरील योजनेतील आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे.खामसवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत एकूण ३ स्वस्त धान्याची दुकाने असुन, तिनही रेशन दुकान मधुन आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे. आनंदाचा शिधा वाटप किट मध्ये अर्धा किलो मैदा, हरभरा डाळ अर्धा किलो, गोडे तेल१ किलो, साखर १ किलो,पोहे अर्धा किलो, गरा अर्धा किलो असे एकूण चार किलो माल तीन रेशन दुकानातील एकुण १०५० लाभार्थी रेशनकार्ड धारकांना १०० रुपयामध्ये वाटप करण्यात आला आहे. या वाटपा वेळी सिद्धेश्वर सुरवसे,लिबराज खरटमोल,ईनुस बेग,शाम गीरी,संजय शेळके, अशोक सुरवसे,रेशन दुकानदार बालाजी चौरे,शरद सिरसट यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.