ताज्या घडामोडी

पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या वादात तब्बल बावीस तासांनी गुन्हा दाखल तर गुन्हा दाखल होताच दहा मिनिटातच चोरी गेलेला मुद्देमाल जप्त ::: पोलिसांची कामगिरी संशयाच्या भोवऱ्यात

येरमाळा पोलीस ठाणे व वाशी पोलीस ठाणे यांच्या ठाणे हद्दीच्या वादात तांदूळ चोरी झालेल्या ट्रकवाल्याची चांगलीच दमछाक झाली तर गुन्हा दाखल होताच अगदी दहा मिनिटात चोरी गेलेला तांदूळ आरोपीविना पोलीस ठाण्यात आल्याने पोलीस आणि चोरांची मिलीभगत की
पोलीस शिरजोर अशा चर्चेला परीसरात उधाण आले आहे.

,              हैद्राबाद ते बीड कडे जाणाऱ्या ट्रक क्र.के.ए.५६ १३७७ गाडीतून ताडपत्री फाडून एश्वर्या एग्रो प्रोसेसर प्रा.लि.कंपनीचा मिनी कोलम तांदळाचे ९६२ कट्टे माल घेऊन जात असताना तेरखेडा येथील लक्ष्मीपारधी पिढी ते बीड रोडवर बारा टायर चालत्या गाडीतून अज्ञात चोरट्यांनी ताडपत्री तोडून ३२ तांदळाचे कट्टे चोरल्याचा प्रकार सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. हा प्रकार चालकाला मागून येणाऱ्या वाहधारकांनी सांगितल्यावर लक्षात आला. त्याने रहदारी पाहून गाडी उभी केली व वाशी पोलीस ठाण्याच्या उभा असलेल्या पेट्रोलिंग पोलीसांना ही माहिती दिली त्या चालकाला मदत करायची सोडून गस्तीला असलेल्या पोलिसांनी चालकाला आमच्या हद्दीत गुन्हा घडला नाही,तू येरमाळा पोलिस ठाण्यात जा असे सांगितले.चालकाने गाडी सह येरमाळा पोलिस ठाणे गाठले असता येरमाळा पोलिसांनी चालकाला गाडीत घालून घटना स्थळ गाठले तेव्हा हा प्रकार आमच्या हद्दीत नाही तर वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने वाशीला तक्रार द्या असे सांगून येरमाळा येथून गाडी घेऊन पहाटे तीन वाजता वाशीकडे पाठवले. दोन्ही ठाण्याच्या हद्दीच्या वादात मंगळवारी रात्री पर्यंत घटना घडल्या पासून बावीस तास गुन्हा नोंद केला गेला नाही.

शेवटी दोन्ही ठाण्याच्या हद्दीच्या वादात मंगळवारी रात्री आठ वाजता चालक मोहम्मद नबिसाहब मोहम्मद उस्मानसाहब भंगिवाले रा.होटगी. ता.हुमानाबाद जि.बिदर याच्या फिर्यादी वरुन गाडीतील १३१८ रु. किंमतीचे ३२ कट्टे एकूण ४२१७६ रु.माल अज्ञात चोरट्याने चोरल्याची फिर्यादीवरुन रात्री येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरील घटने नंतर घटना ग्रस्त वाहनधारकांना तात्काळ मदत करायचे सोडून दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीच्या वादात मंगळवारी दिवसभर गुन्हा सुद्धा नोंद केला नसल्याने सदरील प्रकारावरुन या दोन्ही पोलिस ठाण्याच्या पोलिसांचे आणि वाटमारी करणाऱ्यांचे लागेबांधे आहेत की काय अशा चर्चेला या प्रकाराने उधाण आले असून महामार्गावरील कांहीं हॉटेल चालकांनी दोन्ही पोलिस ठाण्याच्या गस्तीच्या गाड्या परिसरातील सराईत गुन्हेगार चालवताना पाहिल्याचे देखील नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
चोरी करत असताना आठ चोरट्यांनी एक शाईन नंबर दिसला नाही,एक स्प्लेंडर बिगर नंबर ची आणि एक पीकअप च्या मदतीने गाडीतील माल चोरताना पाहिल्याचे सांगितले.मात्र भीती पोटी आपण एका हॉटेल वर गाडी उभा करुन पाहिल्याचे चालक मो.नबीसहाब भंगीवाले यांनी सांगितले.
…सदरील घटनेतील चोरीला गेलेला मुद्देमाल गुन्हा नोंद करण्याच्या पूर्वी पोलिसांना मिळाला मात्र माल चोरणारा एकही आरोपी पोलिसांना सापडला नाही या वरुन पोलिसांची कामगिरी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
.पोलिसांनी ट्रक चालकाला हद्दीच्या वादात रात्रभर वाशी,येरमाळा फिरवत अखेर बावीस तासा नंतर येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.राष्ट्रीय महामार्गावर सतत वाहनातील मालं चोरीला जाणे,खाजगी वाहने लुटणे हे रोजचेच प्रकार झाले असून बावीस तास गुन्हा नोंद करण्यासाठी वेळ लागलेल्या पोलिसांना गुन्हा नोंद करण्यापूर्वी चोरीला गेलेला माल मिळाला पण माल चोरणारे चोर मिळाले नसल्याने येरमाळा पोलिसांचे व वाटमारी करणाऱ्यांचे लागेबांधे आहेत की काय अशा चर्चेला सदरील घटनेनंतर उधाण आले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.