ताज्या घडामोडी
कार्तिक एकादशी निमित्त स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने फराळाचे आयोजन

ओंकार पवार//. शिरढोण
शिराढोण (प्रतिनिधी)कळंब तालुक्यातील शिराढोण येथे आज कार्तिक एकादशी निमित्त स्वराज्य फाऊंडेशन च्या वतीने स्वराज्य नगर शिराढोण येथे पांडूरंग परमात्म्याची आरती व उपवासाच्या फराळाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी मोठ्या संख्येने गावातील भाविकांनी उपस्थित राहुन आरती व फराळाचा लाभ घेतला..
या कार्यक्रमाचे नियोजन स्वराज्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाम काका पाटील, कृष्णा पांचाळ, कृष्णा पवार, अमोल पाटील, धर्मराज पवार,गणेश पांचाळ,विश्वनाथ पांचाळ, संजय पानढवळे यांनी केले होते…