ताज्या घडामोडी

प्रा. सोमनाथ लांडगे यांना त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव विशेष प्रवचनकार म्हणून सन्मान

धाराशिव —
उजनी येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज संजीवन समाधी सोहळा (वर्ष ३७६ वे) चालू असून या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक चळवळीतील सक्रिय असलेले व वारकरी संप्रदायातील अभ्यासक
प्रा. सोमनाथ महाराज लांडगे यांना त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव विशेष प्रवचनकार म्हणून सन्मान करण्यात आले. यावेळी सन्मान पत्र व श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज अभंग गाथा देऊन श्री गणेशनाथ सेवा मंडळ, उजनी यांच्या वतीने या वर्षीच्या कार्तिकी यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्ष विशेष प्रवचनकार म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ह.भ.प.श्री प्रा. सोमनाथ महाराज लांडगे यांनी केलेल्या श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या अभंग गाथेतील अभंगावरील ऑनलाइन प्रवचन सेवेच्या माध्यमातून संत-साधू- महात्म्यांचे अनमोल आणि दैवी विचार सर्वसामान्य जीवाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी आणि योग्य आध्यात्मिक मार्गाची ओळख करून देण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरले, त्यासाठी श्री गणेशनाथ सेवा मंडळ, उजनी, ता. औसा, जि. लातूर तर्फे २०२३ या वर्षीच्या कार्तिकी यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्ष विशेष प्रवचनकार म्हणून आपणास सन्मानित करण्यात येत आहे असे संस्थानाच्या वतीने अध्यक्ष
श्री धनराज पाटील, सचिव श्री देवीदास पाटील, उपाध्यक्ष गोरोबा रेकणे यांनी सांगितले. प्रा. सोमनाथ महाराज लांडगे यांना या संस्थानाने सन्मानित केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.