ताज्या घडामोडी

शिराढोण पोलिसांची हिंगणगाव येथील दारू अडयावर धाड

कळंब/ जयनारायण दरक

कळंब तालुक्यातील हिंगणगाव येथे एक इसम अवैदयरित्या हातभट्टी दारू विकत असल्याची माहीती शिराढोण पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक कल्याण नेहरकर यांच्या आदेशानुसार दि २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास धाड टाकली असता हिंगणगाव येथील गोकुळ रतन लोंढे हा राहत्या घराच्या समोरील पञ्याच्या शेडमध्ये हातभट्टी दारू विनापरवाना अवैदयरित्या विकत असताना पकडले
त्याच्याकडील १० लिटर दारू पोलिसांनी जप्त केली असुन पोलिस जमादार बाळासाहेब गोंदकर यांच्या फिर्यादिवरून शिराढोण पोलिस ठाण्यात गोकुळ लोंढे याच्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक कल्याण नेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गायकवाड हे करत आहेत

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.