एकच मिशन धनगर एस.टी.आरक्षण::: धाराशिवला 30 नोव्हेंबरला धडक मोर्चा

एकच मिशन धनगर एस.टी.आरक्षण
: दिवसभर घराघरात पोहचवा.. एकच मिशन…
S. T. आरक्षण: उठ धनगर जागा हो!
आरक्षणाचा धागा हो: आमची साधी मागणी …
S. T. आरक्षण अंमलबजावणी…
: S. T. प्रमाण पत्र द्या…
नाहीतर सत्ता सोडून द्या…
: S. T. आरक्षणाशिवाय मार्ग नाही दुसरा…
नाहीतर मग सत्ता वासरा…
: एक तर S. T. आरक्षण…
नाहीतर सत्ता परिवर्तन…: आमची एकच मागणी…
S. T. आरक्षण अंमलबजावणी..: S. T. आरक्षणात धनगर नाव…
पण सरकार करतयं दुजाभाव…: दुसर्या राज्यात धनगरांना S. T. आरक्षण…
महाराष्ट्रात मात्र फसवं शासन.: S. T. आरक्षण अंमलबजावणी करा…
नाहीतर खुर्च्या खाली करा.: धनगर S. T. मध्ये 29 नंबरवर
मग तुम्ही अंमलबजावणी कराबरं: नको आम्हा हजार कोटी अन अश्वासने खोटी…
फक्त आरक्षण अंमलबजावणी करा एस. टी.: S. T. आरक्षण आमच्या हक्काचं.
नाही कुणाच्या बापाचं.
S. T. आरक्षण आमचा अधिकार…
आणि तो आम्ही मिळवणार..
धनगर समाजाची एकच मागणी
S. T. आरक्षण अंमलबजावणी.
धनगर आरक्षणाचे सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये चक्रीवादळ सुरू झाले आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन समाज जागृती करुन घोंगडी बैठकाचे आयोजन करत आहे .त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यांमधील समाजाचे कार्यकर्ते हे अतिशय जोमाने व उत्साह पणे कार्य करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या समाजाला याचा नक्कीच फायदा मिळत आहे.
घोंगडी बैठकाच्या माध्यमातून आपला समाज किती मागासलेला आहे ,किती दुभंगलेला आहे याचे सर्व चित्रण आपल्या वास्तव तथ्य डोळ्यासमोर येत आहे .काही काही गावात तर आपला समाज एक तर खाली मान घालून किंवा कुठल्याही प्रकारच्या सक्रिय सहभागापासून दूरच असल्याचे निदर्शनास येत आहेत. घोंगडी बैठकीच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक गावातील धनगर समाजाच्या भावना ,त्यांच्या अपेक्षा अतिशय उंचावलेल्या आहेत व याचा फायदा प्रत्येक समाजातील वर्गाला होईल यात काही शंका राहत नाही
संविधानात जी आपल्याला तरतूद करून आरक्षणाची विषय मंजूर आहे ताे लवकरात लवकर अंमलबजावणीच्या माध्यमातून आपल्याला लागू झाल्याशिवाय राहणार नाही यात काही शंका नाही . यासाठी 30 नोव्हेंबरला धडक मोर्चात सहभागी व्हा असे आवाहन सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.