ताज्या घडामोडी

धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार, तीन जखमी

 

कळंब/ जयनारायण दरक

मयत नामे- प्रविण सचिन निवरगी, रा.आदर्शनगर एमआयडीसी सोलापूर व जखमी नामे- अरविंद शरणप्पा काबनुर रा. आदर्शनगर एमआय डीसी सोलापूर हे दोघे दि.29.11.2023 रोजी 16.00 ते 17.00 वा. सु. तुळजापूर घाटात उतारावर रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 13 सीई 7791 ही वर बसून जात होते. दरम्यान कार क्र एमएच 31 एफ ई 5435 च्या चालकाने त्याचे ताब्यातील कार ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे चुकीच्या दिशेने चालवुन जखमी नामे अरविंद काबनुर यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली.
या अपघातात प्रविण निवरगी हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर अरविंद काबनुर हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. तसेच नमुद कार चालक हा अपघात करुन आपघाताची माहिती न देता कार सह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी- नरेंद्र शरणाप्पा काबनुर, वय 30 वर्षे, रा. निलमनगर एमआयडीसी सोलापूर ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांनी दि.04.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह 134 (अ) (ब)मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : जखमी नामे- राहुल कचरु सोनवणे, 2) राखी राहुल सोनवणे, त्यांची मुलगी- मयत नामे रोहीणी राहुल सोनवणे, वय 07 वर्षे रा. हिसोरी ता.जि. लातुर हे तिघे दि.29.11.2023 रोजी 18.30 वा. सु. जागजी गावाचे जवळ रोडवरुन मोटरसायकल वर बसून जात होते. दरम्यान ट्रॅक्टर क्र एमएच 25 एएस 0858 च्या चालकाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्रटरला उसाच्या लोढची विना नंबर ट्रॉली जोडून व त्या ट्रॉलीला पाठीमागील बाजूस प्रकाश परावर्तीत करणारे रिप्लेक्टर अथवा रेडीयम न लावता ट्रॅक्टर ट्रॉलीसह रोडवर उभे केल्याने यातील जखमी नामे राहुल सोनवणे यांची मोटरसायकल ट्रॉलीला पाठीमागून धडक बसून अपघात झाला. या अपघातात रोहीणी राहुल सोनवणे, वय 7 वर्षे ही गंभीर जखमी होवून मयत झाली. तर राहुल सोनवणे, राखी सोनवणे हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाउ- रोहीत कचरु सोनवणे, वय 28 वर्षे, रा. हिसोरी ता.जि. लातुर यांनी दि.04.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 283, 337, 338, 304 (अ) सह 134 (अ) (ब), 187, 104, 77 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.