स्वातंत्र्य सैनिकाचे बोगस नामनिर्देशन पत्र बनवून नोकरी मिळवल्या प्रकरणी बब्रुवान नामदेव साबळे यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करा– राजाभाऊ राऊत
धाराशिव प्रतिनिधी :- स्वातंत्र्य सैनिकाच्या बोगस नामनिर्देशन पत्राद्वारे शासकीय सेवेचा लाभ घेऊन शासन व प्रशासनाची फसवणूक करणारा बब्रुवान नामदेव साबळे वर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक,व पोलीस निरीक्षक आनंद नगर पोलीस स्टेशन धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि,बब्रुवान नामदेव साबळे हा जातीने(S C) चांभार असून रा.मुरुड ता जि लातूर येथील आहे.तर श्री किसन दत्तू गोंधळी,हे जातीने गोंधळी-भटक्या जमाती (N.T.B)रा.तुळजापूर ता.तुळजापूर.जि. धाराशिव येथील आहेत.हे दोघेही जातीने वेगवेगळे आहेत.किसन दत्तू गोंधळी हे महाराष्ट्र शासन सन्मानित स्वातंत्र्य सैनिक आहेत.बब्रवान नामदेव साबळे यांने गोंधळी यांच्या नामनिर्देशन पत्राच्या आधारे स्वातंत्र्य सैनिकाच्या राखीव कोट्यामधून नोकरी मिळवली आहे बब्रुवान साबळे हा किसन दत्तू गोंधळी यांच्या जातीचे किंवा रक्तातील नाते संबंधातील व्यक्ती नाही. श्री साबळे यांने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातून बनावट स्वातंत्र्य सैनिकाचे नाम निर्देशनपत्र तयार करून शासनाला फसवून नोकरी मिळवली तर (एसी)संवर्गातून तीन वेळा पदोन्नती घेतलेली आहे. शासकीय अध्यापक विद्यालय उदगीर,जि,लातूर येथे सेवत रुजू दि 22/5 /1993 ते सेवानिवृत्ती 31/5 /2023 या कालावधीती शासनाकडून घेण्यात आलेल्या सर्व सवलती व सुविधा याची संपूर्ण वसुली करून ती शासन खाती जमा करावी
श्री.बब्रुवान साबळे याच्यावर तात्काळ शासनाची फसवणूक करून बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळविल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी रिपाइं (खरात(पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी केली आहे.