
शिराढोण/ ओंकार पवार
कळंब तालुक्यातील उपबाजारपेठेचा लिलाव प्रक्रिया गुरुवारी पार पडली. यामध्ये तालुक्यातील तीनशे व्यापा-यांनी सहभाग नोंदविला असुन दोन
कोटी चारलाख पन्नास हजार रुपये अनामत रक्कमेची बोली व्यापा-यांनी लावली आहे.
सन 1983 साली सात एकर जागा शिराढोण उपबाजार समितीला मिळाली होती. त्यानंतर याकडे तत्कालीन पदाधिका-यांनी दुर्लक्ष केले होते .गेल्या
पंधरा वर्षामध्ये याठिकाणी कळंब बाजार समितीमार्फंत गोडावुन,सिमेंट रस्ते, लिलाव कटटा आदिचे बांधकाम करण्यात आले होते. तब्बल चाळीस वर्षांनी सभापती
शिवाजी कापसे
यांनी खुल्या विस प्लॉटचे जाहीर लिलाव पध्दतीने वाटप करण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करुन चार तारखेला लिलाव ठेवण्यात आला होता. गुरुवारी तीनशे
व्यापा-यांनी
लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदविला होता. लिलावामध्ये प्रत्येक खुल्या प्लॉटसाठी व्याप-यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला चढाओढीने अनामत रक्कमेची बोली लावली.
एक नंबरचा सर्वाधिक सोळा लाख रुपयाला अनामत
रक्कम देवुन कळंब येथील दिग्गज व्यापारी बलाई यांनी घेतला तर सर्वाधिक कमी सोळा नंबरचा प्लॉट सहा लाख एकोणतीस हजार रुपयाची बोली जुगल मुंदडा
यांनी लावुन प्लॉट काबीज केला. विस प्लॉटमध्ये एकोणीस नंबरचा प्लॉट अपंगासाठी राखीव ठेवला होता. त्यातही सात अपंग व्यापा-यांनी सहभाग नोंदवुन आठ लाख एकावन
हजार रुपयाची बोली विष्णुदास काळे यांनी लावली. विस प्लॉटचे एकुण दोन कोटी चार लाख पन्नास हजार रुपये अनामत रक्कमेपर्यंत बोली व्यापा-यांनी लवली
असल्याने कळंब बाजार समिती मालामाल झाली आहे.
पात्र व्यापा-यांना दोन दिवसाच्या आत लावलेल्या बोलीच्या पंचेविस टक्के रक्कम भरुण उर्ववरी रक्कम एक महिन्याच्या आत भरणे बांधनकारक आहे.
शिवाय निवडीचे पत्र मिळाल्यापासुन सहा महिन्याच्या आत दुकान बांधकाम करुन व्यवसाय करण्याची अट आहे. बोली नुसार किती व्यापारी संपुर्ण रक्कम भरुन
घेवुन आडत दुकान
सुरु करतात. याकडे सर्वसामान्य व्यापा-यांच्या नजरा लागल्या आहेत. यावेळी बंकट शिंदे सहायक निबंधक ,अनिस सयद सभापती शिवाजी कापसे,सचिव दत्तात्रय
वाघ,माजी पंचायत समिती सदस्य राजेश्वर पाटील,सरपंच लक्ष्मीताई म्हेत्रे,उपसरपंच अमित माकोडे,संचालक हणुमंत आवाड,अशोक टेळे,विलास पाटील,ज्योती
महाजन,बेबीनंदा गायसमुद्रे,ज्योती नाईकवाडे आदि व्यापा-यांची उपस्थिती होती.