ताज्या घडामोडी

शिराढोणमध्ये आयोध्या धाम येथुन आलेल्या अक्षता कलश पुजन व भव्य शोभा यात्रेचे आयोजन

चिमुकल्यांनी राम सिता लक्ष्मण हनुमान लव्ह कुंश यांच्या साकारल्या वेशभुषा

शिराढोण प्रतिनिधी —
शिराढोणमध्ये आयोध्या धाम येथुन आलेल्या अक्षता कलश पुजन व भव्य शोभा यात्रेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. शोभा यात्रेची सुरुवात विठल रुक्मीनी मंदिरापासुन सर्व गावातील गल्लीतुन प्रभु श्रीरामाची मिरणुक काढण्यात आली. व्यापा-यांनी पुष्पवृष्टी तर महिला गृहिणींनी घरासमोरील
पालखीचे स्वागत करुन पुजन करण्यात आले.यावेळी फेरी दरम्यान निमंत्रणपत्र व अभिमंत्रित केलेल्या अक्षदा घरोघरी वाटप करण्यात आल्या. या अक्षता बाविस जानेवारी रोजी आपअपल्या घरात प्रभु श्रीरामंचा अशिर्वाद म्हणुन आपल्या घरातील देवघरात संग्रही ठेवण्याचे आव्हान करण्यात आले. चिमुकल्यांनी राम सिता लक्ष्मण हनुमान लव्ह कुश आदिच्या वेशभुषा प्रधान केल्या होत्या. एकही नारा जय श्रीराम या जयघोषाने शिराढोण नगरी दुमदुमली होती. या शोभा यात्रा व कलश फेरीला गावातील सकल हिंदु बाधवांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद देवुन हजेरी लावली होती. शोभा यांत्रेनंतर विठल रुक्मीनी मंदिरात महाप्रसादाने सांगता समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी सकल हिंदु समाज बांधवानी परिश्रम घेतले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.