ताज्या घडामोडी
येरमाळा येथे मोफत महिला सर्वरोगनिदान शिबीराचे आयोजन

कळंब तालुक्यातील येरमाळा येथे महिलांसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने मोफत महिला सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र येरमाळा येथे करण्यात आले आहे. मोफत महिला सर्व रोग निदान शिबिरात स्त्रीरोग तपासणी व उपचार, कॅन्सरची तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदाब / मधुमेह तपासणी, अस्थिरोग तपासणी, त्वचारोग तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी, कान, नाक, घसा तपासणी, सर्वसाधारण तपासणी इत्यादी आजारावर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन व औषधोपचार केला जाणार आहे. तरी गावातील सर्व महिलांनी शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसेवक यांच्याकडून करण्यात आली.आहे