ताज्या घडामोडी

येरमाळा नागरिकांनी केलेल्या रास्तारोकोची दखल ::: पंढरपूर -खामगाव महामार्गारील रखडलेली कामे मार्गी लागणार 

येरमाळा येथुन गेलेल्या पंढरपुर – खामगाव महामार्गाच्या कामामध्ये झालेल्या भोंगळ कारभाराच्या विरोधामध्ये येरमाळा नागरीकांनी दि .20 डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन केले होते . याची दखल घेत संबंधीत कार्यालयाने याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अधिकारी पाठवुन प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली .
खामगाव पंढरपूर या महामार्गाच्या कामाला सुरूवात होऊन पाच ते सहा वर्ष होऊनही हा महामार्ग अजुनही पूर्ण झालेला नाही . ठिकठीकाणी अर्धवट कामे आहेत . येरमाळा येथुन जाणाऱ्या महामार्गांच्या बाजुला रखडलेल्या नाल्या तसेच येरमाळा घाटातील अर्धवट रस्त्याचे काम तसेच इतरही अर्धवट कामे लवकर सुरू करावीत यासाठी येरमाळा येथील नागरीकांनी 20 डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन केले होते . तसेच प्रत्यक्ष कामाला सुरूवात न झाल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता याची दखल घेत जिल्हाधीकाऱ्यांनी यावर तात्काळ प्रत्यक्ष पहाणी करून योग्य ती कार्यावाही करण्याचे आदेश दिले . यावर काल दि .11 जानेवारी रोजी वनवे मॅडम कार्यकारी अभियंता व मा कोटेजा उप अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुख्यालय संभाजी नगर यांनी येरमाळा येथे भेट देऊन प्रत्यक्ष पहाणी करुन गावामध्ये आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक , गटारं , नाल्या ,स्टेट लाईट चालू करणे येरमाळा घाट रस्ता लवकरच कामे चालू करू असे आश्वासन दिले आणी तुम्ही करणार आसणारे संभाजीनगर कार्यालय समोर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीचे लाक्षणिक उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली यावेळी . आणि आज दि .12 रोजी येरमाळा घाटातील कामाला प्रत्यक्ष सुरुवातही करण्यात आली . यावेळी राहुल पाटील , लहू पाटील अनिल तात्या पवार , मारुती बारकुल ,दत्ता कसपटे ,नितीन बारकुल ,व निशिकांत गायकवाड , माजी सरपंच मुरहारी कांबळे  उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.