ताज्या घडामोडी

पोलीस आणि महसूल विभागाकडून पारधी समाजाला मोलाचे मार्गदर्शन

कळंब/जयनारायण दरक

कळंब तालुक्यातील पोलीस ठाणे शिराढोण हद्दीतील शिराढोण पारधी पिढी (क्रांतीनगर, जि प्र शाळा) येथे . संजय पवार साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग कळंब ,तसेच श्रीमती प्रिया मोदा मॅडम, कळब महसूल विभाग (प्रो जिल्हाधिकारी) तसेच पोलीस ठाणे शिराढोण येथील पोलीसआणि महसूल विभागाचे व संबंधित प्रशासनाचे मा. अधिकारी व कर्मचारी वृंद असे मिळून सदर पारधी पिढीवरील पारधी समाजाचे नागरिक व प्रतिष्ठित नागरिक शहाजी पाटील, माजी जिल्हापरिषद सदस्य, तसेच बजरंग तरटे, नितीन पाटील आदी मिळून शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन तसेच सदर योजनेअंतर्गत *१)जात प्रमाणात -09 2)राशन कार्ड वाटप 02 3)आधारकार्ड व नोंदणी/दुरुस्ती,16 4)निराधार/आदिवासी पेन्शन योजनेचा लाभ तसेच इतर योजना व त्याअनुषंगाने प्रमानपत्रांचे वाटप-03 हे संजय पवार साहेब (SDPO, कळंब ) प्रिया मोदा मॅडम, ह्यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.

तसेच *माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सर्व पारधी बांधवांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले त्यावेळी सर्व पारधी समाजाने त्यांच्या पाल्यांना शिक्षण देण्याची शपथ घेण्यात आली.रोजगार मेळाव्यात सहभागी* होणेबाबत उपस्थित मा. वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी मिळून आव्हान केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.